सोमनाथ आर्ट्स फाउंडेशन सासवड आणि सिद्धाई टूर्स, पुणे ह्यांच्या सयुंक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालन येथे दि.९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी 10 वाजता उदघाटन सोहळा पार पडला. आधुनिक वाल्मिकी ग.दि. मांनी शब्दांकित केलेल्या आणि स्वरतीर्थ बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या गीत रामायणाच्या गाण्यांच्या प्रसंगावर आधारित असे भव्य रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गदिमांचे वारसदार श्री आनंद गजानन माडगुळकर उपस्थित होते. तसेच गीत रामायण प्रदर्शित झाले त्यावेळी जे कलाकार होते त्यांच्या वारसदारांना सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर तसेच पुणे महानगर संघचालक श्री रवींद्र वंजारवाडकर ह्यांनी हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमादरम्यान सोमनाथ आर्टस् फाउंडेशन सासवड आणि सिद्धाई टूर्स,पुणे यांच्या वतीने मा.जगदीश चव्हाण ,रांगोळी कलाकार,पुणे मा.सुनील शेगांवकर , चित्रकार ,नागपूर यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेते थ्री डी रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे ,सासवड यांच्या हस्ते कलारत्न पुरस्कार देण्यात आला. रांगोळी प्रदर्शनामध्ये गीत रामायणातील 56 गीतांवर आधारित 56 रांगोळ्या आणि इतर 4 रांगोळ्या…अशा एकूण 50 कलाकारांनी 60 रांगोळ्या साकारल्या असून यासाठी 200 किलो रंग रांगोळीचा वापर करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.संगिता भावसार ,कोल्हापूर यांनी केले तर..आभार प्रदर्शन कौस्तुभ वर्तक यांनी केले सदर प्रदर्शन येत्या १३ तारखेपर्यंत सुरू असून जास्तीत जास्त कलाप्रेमी रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा.. सदर प्रदर्शनातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग आश्रम शाळांमधील मुलांसाठी मदत म्हणून करण्यात येईल..