पुणे, ता. २३: उत्कर्ष भंडारकर यांना नवी दिल्ली येथील रेडिसन ब्लू, व्दारका येथे आयोजित ‘नॅशनल प्रेस्टिज अवॉर्ड्स’ (इन्साइट्स एक्सलन्स अवॉर्ड्स) सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर यांच्या हस्ते ‘एक्सलन्स इन नॅशनल मीडिया अँड ब्रँड इम्पॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यावसायिक जगातील नवकल्पना, नेतृत्व, धोरण आणि विविध क्षेत्रांतील योगदानाला जागतिक व राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणे या उद्देशाने कॉर्पोरेट जगतात, विविध उद्योगांमध्ये आणि व्यवसायांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यावसायिक, उद्योजक आणि संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पुणे येथील युवा उद्योजक उत्कर्ष भंडारकर यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

